27 मे 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (२७ मे २०२२)

कुलपती पद राज्यपाल नव्हे तर मुख्यमंत्री यांना देण्याचा कायदा होणार :

  • बंगालच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
  • तर यासंबंधीचे विधेयक विधानसभेत आणले जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी दिली आहे.
  • तसेच यापुढे सरकारी विद्यापीठांचे कुलपती राज्यपाल नसून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असणार आहेत.
  • राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनी गुरुवारी राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
  • बसू म्हणाले की, हा प्रस्ताव लवकरच पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयकाच्या रूपात मांडला जाईल.
  • राज्यपाल सध्या सरकारी विद्यापीठांचे कुलपती आहेत.

भारतात सर्वात मोठ्या ‘ड्रोन महोत्सवा’चे आयोजन :

  • नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्धाटन करण्यात येणार आहे.
  • ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांचा शिडकावा कसा करायचा याचे प्रात्यक्षिक या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे.
  • तर हा महोत्सव दोन दिवसांचा असून तो 27 आणि 28 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
  • या महोत्सवात 70 हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या विविध वापराचे प्रकार दाखवणार आहेत.
  • सरकारी अधिकारी, सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल,खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअप्ससह 1600 हून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

आशिया चषक हॉकी स्पर्धात भारताची लक्षवेधी मुसंडी :

  • तरुण भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी अखेरच्या साखळी लढतीत इंडोनेशियाचा 16-0 असा धुव्वा उडवत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मुसंडी मारली.
  • भारताने सामन्याच्या अखेरच्या सत्रात सहा गोल नोंदवण्याचा पराक्रम दाखवला.
  • अ-गटातून जपानने 9 गुणांसह गटविजेत्याच्या थाटात पुढील फेरी गाठली.
  • भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खात्यावर समान चार गुण जमा होते; परंतु सरस गोलफरकाआधारे भारताने पाकिस्तानला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात श्रीशंकरला सुवर्णपदक :

  • भारताचा आघाडीचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकरणे कॅलिथिया (ग्रीस) येथे झालेल्या 12व्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 8.31 मीटर विक्रमी अंतरासह सुवर्णपदकाची कमाई केली.
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या श्रीशंकरने गेल्या महिन्यात 8.36 मीटरचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
  • तर या स्पर्धेत स्वीडनच्या थोबियास माँटलरने रौप्यपदक आणि फ्रान्सच्या ज्युलीस पॉमेरीने कांस्यपदकाची कमाई केली.
  • 10 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत फक्त तीन स्पर्धकांना आठ मीटरचे अंतर ओलांडता आले.

दिनविशेष:

  • 1883 मध्ये अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना 1906 मध्ये झाली.
  • 1951 मध्ये मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे 1935 मध्ये निधन झाले.
  • 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment