7 मे 2022 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

current affairs in marathi

चालू घडामोडी (7 मे 2022)

स्वदेशी वस्तूंच्या वापराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जोरदार पुरस्कार :

  • स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच, आपण परदेशी वस्तूंचे नकळत मानसिक गुलाम होत आहोत का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
  • त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून दैनंदिन वापरातील वस्तूंची यादी करावी.
  • तर त्यातील परदेशी वस्तूंच्या जागी स्वदेशी उत्पादनांच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वदेशी वस्तूंच्या वापराचा जोरदार पुरस्कार केला.
  • स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नवउद्योजकांना उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  • जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘जीतो कनेक्ट 2022’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी दूरभाष पद्धतीने केले.

आशियाई क्रीडा स्पर्धा लांबणीवर :

  • चीनमधील ताज्या करोना लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे हांगझो येथे 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
  • नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.
  • करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शांघायमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
  • त्यामुळे 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेपुढे अनिश्चिततेचे सावट पसरले होते.
  • 61 क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या आशियाई स्पर्धेत सुमारे 11 हजारांहून अधिक क्रीडापटू सहभागी होणार होते.

ज्यांनी जास्त बळी घेतले तेच संघ गुणतालिकेत टॉपमध्ये :

  • आयपीएलचा पंधरावा हंगाम अनेक अर्थांनी वेगळा ठरला आहे.
  • तर या हंगामात दिग्गज संघांना धक्का बसला असून ते सध्या गुणतालिकेत शेवटी आहेत.
  • तर दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्ससारखे संघ गुणतालिकेत टॉप चारमध्ये असून त्यांनी धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे.
  • तसेच लखनऊ, गुजरात या संघांसोबतच राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांनी गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली आहे.
  • अन्य संघांच्या तुलनेत जास्त विकेट्स घेतल्यामुळेच या संघांना गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यात यश मिळाले आहे.
  • मुंबई इंडियन्स हा संघ सर्वात जास्त म्हणजेच 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलेला संघ आहे.

रोहित शर्माने केली ‘ही’ अनोखी कामगिरी :

  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये लढत होत आहे.
  • दरम्यान, सलामीला आलेल्या रोहित शर्माने तर अवघ्या 28 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या.
  • तसेच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर आगळ्यावेगळ्या कामगिरीची नोंद झाली आहे.
  • तर हे षटकार लगावताच त्याने एकट्या मुंबई संघाकडून खेळताना 200 षटकार लगावण्याचा विक्रम केलाय.
  • मुंबईकडून खेळताना त्याच्या नावावर आता 201 षटकार आहेत.

दिनविशेष :

  • 1907 मध्ये 7 मध्ये मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅमसुरू झाली.
  • सोनी ह्या कंपनीची स्थापना 1946 मध्ये 7 मध्ये झाली.
  • एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा 1907 मध्ये 7 मध्ये सुरू झाली.
  • लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 1990 मध्ये 7 मध्ये प्रदान.
  • 1992 मध्ये 7 मध्ये एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
  • पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात 1861 मध्ये 7 मध्ये जन्म.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.