चालू घडामोडी (१९ मे २०२२)
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा :
- दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आपला राजीनामा सादर केला.
- तर त्यांनी पाच वर्षे पाच महिने या पदावर काम केले.
- 1969च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले बैजल यांना डिसेंबर 2016 मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आले होते.
- त्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहसचिव म्हणून काम पाहिले होते.
- प्रसार भारती व इंडियन एअरलाइन्स यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.
योगी सरकारचा नवा निर्णय :
- काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता.
- यानंतर आता राज्यातील मदरशांबाबत योगी सरकारने अजून एक निर्णय घेतला आहे.
- योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार इथून पुढे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन होणाऱ्या नव्या मदरशांना कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान मिळणार नाही.
- यासंदर्भात सादर करण्यात आलेला प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारने १७ इंच रोजी स्वीकारला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
- उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धात निखत अंतिम फेरीत :
- भारताच्या निखत झरीनने वर्चस्वपूर्ण विजयासह बुधवारी इस्तंबूल येथे चालू असलेल्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
- परंतु उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे मनीषा मौन आणि परवीन हुडा यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला 5-0 असे सहज नामोहरम केले.
- कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.
- आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत.
डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास :
- आयपीएल 2022 सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे.
- तर या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला.
- मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2022 च्या 66 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स
- प्रथम खेळून 20 षटकात एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या.
- एलखानूकडून क्विंटन डी कॉक 140 आणि कर्णधार केएल राहुल 68 धावांवर नाबाद माघारी परतले.
- आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे.
दिनविशेष :
- 1743 मध्ये 19 मध्ये जीन पियरे क्रिस्टीन त्यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी विकसित केली.
- हॅले धूमकेतू पुच्छ 19 1910 मध्ये मध्ये पृथ्वीला चाटुन गेले.
- पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 1911 मध्ये मध्ये सुरु झाली.
- 19 1910 मध्ये मध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म.
- संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी 1297 मध्ये 19 मध्ये एदलाबाद येथे समाधी घेतली.