चालू घडामोडी (६ जून २०२२)
संरक्षित जंगलात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आवश्यक :
- संरक्षित जंगलात एक किलोमीटरचे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) असावे, असे निर्देश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण आदेशात दिले.
- पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही कायमस्वरूपी संरचनेला परवानगी दिली जाणार नाही.
- राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात खाणकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- तसेच विद्यमान क्षेत्र हे एक किलोमीटर संरक्षित क्षेत्राबाहेरील मोकळय़ा जागेच्या पलीकडे विस्तारित असल्यास किंवा कोणत्याही वैधानिक साधनाने उच्च मर्यादा निश्चित केल्यास, अशी विस्तारित मर्यादा प्रचलित असेल, असेही या आदेशात म्हटले आहे.
- न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बी.आर. गवई आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने टी. एन. गोदावर्मन थिरुमलपद प्रकरणात दाखल केलेल्या अर्जावर हे निर्देश दिले.
देशात ‘कोर्बेव्हॅक्स’ला आपत्कालीन मान्यता :
- ‘जैविक ई’ कंपनीच्या ‘कोर्बेव्हॅक्स’ या लशीचा वापर आपत्कालीन परिस्थितीत ‘वर्धक मात्रा’ (बुस्टर डोस) म्हणून करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांना आता कोर्बेव्हॅक्सची वर्धक मात्रा घेता येईल.
- भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) करोना संसर्ग प्रतिबंधक वर्धक मात्रा म्हणून कोर्बेव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिल्याची घोषणा ‘जैविक ई’ कंपनीने शनिवारी केली.
- आतापर्यंत भारतात विषम लशींच्या वापरास परवानगी नव्हती.
- परंतु ज्यांनी आधी सीरमची कोव्हिशिल्ड किंवा भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, अशांना वर्धक मात्रा म्हणून पुन्हा तीच लस घेण्याची आवश्यकता नाही, तर ते विषम, म्हणजेच कोर्बेव्हॅक्सची मात्रा घेऊ शकतातहे औषध महानियंत्रकानी दिलेल्या मान्यतेमुळे स्पष्ट झाले आहे.
- औषध महानियंत्रकांनी वर्धक मात्रा म्हणून भिन्न लस वापरास मान्यता दिलेली कोर्बेव्हॅक्स ही देशातील पहिली लस आहे.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राच्या खेळाडूंची नऊ सुवर्णपदकांची कमाई :
- खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करताना एकूण नऊ सुवर्णपदकांची कमाई केली.
- महाराष्ट्राला योगासनांत पाच, वेटलििफ्टगमध्ये तीन, सायकिलगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले.
- ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये रविवारी महाराष्ट्राने विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लयलूट केली.
पंजाबमध्ये जुलैपासून प्लास्टिकबंदी :
- एकदा वापरण्याच्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर येत्या जुलैपासून बंदी घालण्याची घोषणा पंजाब सरकार रविवारी केली.
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आभासी कार्यक्रमात विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण सचिव राहुल तिवारी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली.
- पंजाबला अधिक हरित व आरोग्यदायी करण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकवर जुलैपासून बंदी घातली जाईल, असे त्यांनी सांगितले.
- पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना शहीद भगतसिंग पंजाब राज्य पर्यावरण पुरस्कार देण्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.
दिनविशेष :
- ६ जून १६७४ मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
- गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना ६ जून १९३० मध्ये झाली.
- ६ जून १९६९ मध्ये व्ही.एस. पृष्ठ समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.
- भारताचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी डॉ यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.