23 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

शुभमन गिल

शुभमन गिल

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2022)

जलयुक्त शिवार योजनेचं पुनरागमन होणार :

  • राज्यातील 25 हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार योजना’ महाराष्ट्र सरकार पुन्हा कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे.
  • विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावातील समस्या सोडवण्यावर या योजनेचा भर असेल.
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना महाविकासआघाडी सरकारने बंद केली होती.
  • आता राज्यात शिंदे गटासोबत भाजपाने सत्ता स्थापन करताच पुन्हा ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तपशीलावर अहवालाच्या आधारे या योजनेचे स्वरुप आणि अंमलबजावणी निश्चित करण्यात येणार आहे.

शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम :

  • झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शुभमन गिलाने शानदार शतक केले झळकावले.
  • 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात त्याने त्याने 97 चेंडूत 130 धावांची शानदार खेळी केली खेळली.
  • यावेळी गिलने 15 चौकार आणि एक षटकार मारला.
  • हे शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.
  • झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळणारा शुभमन हा भारतीय फलंदाज ठरला आहे.
  • हा विक्रम यापूर्वी तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 1998 मध्ये बुलावायो येथे नाबाद 127 धावा केल्या होत्या.

प्रज्ञानंदने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत :

  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पुन्हा एकदा विश्वविजेता ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं आहे.
  • त्याने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये हा पराक्रम केला आहे.
  • मियामी येथे सुरु असणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रज्ञानंदने मॅग्नसवर विजय मिळवला.
  • हा मागील सहा महिन्यांच्या कालावधीमधील मॅग्नसविरुद्धचा तिसरा विजय ठरला आहे.
  • या विजयासहित प्रज्ञानंद या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे.
  • आर. प्रज्ञानंदची एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेतील विजयाची मालिका शनिवारी खंडितेच झालं.
  • पाचव्या फेरीच्या लढतीत चीनच्या क्वँग लिएम लीने प्रज्ञानंदला पराभूत केले.

भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासकीय समिती संपुष्टात :

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) प्रशासकीय समितीचा कारभार संपुष्टात आणण्याचा आणि पूर्वनियोजित निवडणूक एक आठवडय़ाने पुढे ढकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
  • ‘फिफा’कडून झालेली निलंबनाची कारवाई आणि पर्यायाने गमावलेले कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रविवारी ‘एआयएफएफ’वर नियुक्त प्रशासकीय समिती हटविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.
  • ‘फिफा’शी झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता.
  • ‘फिफा’ने केलेल्या कारवाईनंतर 17 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सरकारला सक्रिय लक्ष घालण्यास सांगितले होते.
  • या संदर्भात न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने महासंघावरील बंदी आणि कुमारी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एआर दवे यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय समिती हटवण्याचा आदेश दिले.

दिनविशेष:

  • 23 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन‘ आहे.
  • 1914 मध्ये पहिले महायुद्ध- जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा 23 ऑगस्ट 1918 रोजी धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म झाला.
  • सन 1991 मध्ये 23 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.
  • कविवर्य विंदा करंदीकर यांना 2005 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाला.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment