6 मे 2022 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

6 मे 2022 चालू घडामोडी | Current Affairs In Marathi

चालू घडामोडी (2 मे 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर जात असताना, युक्रेनमधील वैर थांबावे आणि येथील संघर्षांवर संवाद व राजनैतिक मार्गाने तोडगा निघावा, असे आवाहन भारताने रविवारी केले.
  • व्यापार व गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि संरक्षण यांसाह अनेक क्षेत्रांत तीन युरोपीय देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर पंतप्रधानांच्या भेटीत लक्ष केंद्रित केले जाईल.
  • प्रादेशिक व जागतिक घडामोडींबाबतच्या चर्चेचा भाग म्हणून युक्रेनचा मुद्दाही उपस्थित होईल, असे परराष्ट्र सचिव म्हणाले.
  • मोदी यांच्या दौऱ्यात ऊर्जा सुरक्षेबाबतची चर्चा हा चर्चेचा एक मुख्य भाग असेल, कारण सध्याच्या परिस्थितीत या मुद्याला मोठे महत्त्व आले असल्याचेही क्वात्रा म्हणाले.
  • मोदी आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ शूल्झ हे सोमवारी ‘इंडिया- जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स’ (आयजीसी) चे संयुक्त अध्यक्षस्थान भूषवतील, असे क्वात्रा यांनी सांगितले.

एप्रिलमध्ये GST गोळा करण्याचा नवा विक्रम :

  • देशात एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर (GST) गोळा करण्याबाबत आतापर्यंतचा विक्रम झालाय.
  • एप्रिल 2022 मध्ये एकूण 1.68 लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाला आहे.
  • तर केंद्रीय अर्थमंत्रालयाने 1 इंच रोजी याबाबत निवेदन दिलंय.
  • एकूण मासिक जीएसटी संकलनात पहिल्यांदाच 1.5 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे.
  • तसेच 1 लाख कोटी रुपये संकलनाची ही सलग दहावी वेळ आहे.

ला लिगा फुटबॉल रेयाल माद्रिदला विक्रमी जेतेपद :

  • रेयाल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉलवरील आपली मक्तेदारी कायम ठेवताना शनिवारी एस्पान्योलला 4-0 अशा फरकाने पराभूत केले.
  • तर या विजयासह त्यांनी विक्रमी 35व्यांदा ‘ला लिगा’ फुटबॉलच्या जेतेपदाला गवसणी घातली.
  • रेयालचा बुधवारी याच मैदानावर मँचेस्टर सिटीविरुद्ध चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीचा दुसऱ्या टप्प्यातील सामना होणार आहे.
  • तसेच पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर माद्रिद 3-4 अशा पिछाडीवर आहे.

मरान मलिकने टाकला IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू :

  • सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने जेव्हा जेव्हा हैदराबाद संघ सामना खेळतो आणि समोर कोणताही संघ असतो तेव्हा उमरान मलिक सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू टाकतो.
  • आयपीएलच्या या सीझन मधून फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ द मॅच अवॉर्ड देखील त्याला दिला जात आहे, जो उमरान मलिकने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात जिंकला आहे.
  • एवढेच नाही तर आता त्याने आयपीएल 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही केला आहे.
  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात उमरान मलिकने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.
  • तर त्याचा वेग 154 किमी प्रतितास घडतात.

केएल राहुलने मोडला मोठा विक्रम :

  • लखनौ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुलने नेहमीप्रमाणेच यावेळीही आयपीएलमध्ये वादळ निर्माण केले आहे.
  • रविवारी केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार खेळी केली.
  • तर यादरम्यान, त्याने पहिला षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान 150 षटकार मारणारा फलंदाज बनला.
  • केएल राहुलने 35 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
  • तर त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे 29 वे अर्धशतक आहे.
  • आयपीएलच्या इतिहासात भारताकडून सर्वात जलद 150 षटकार ठोकण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे.
  • त्याचबरोबर केएल राहुलने 100 पेक्षा कमी सामन्यात हा पराक्रम केला आहे.

दिनविशेष :

  • मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी ‘भालजी पेंढारकर’ यांचा जन्म 1899 मध्ये 2 मध्ये झाला.
  • 1964 मध्ये 2 रोजी बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
  • वेस्ट इंडीजचा प्रख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म 2 1969 मध्ये रोजी झाला.
  • सन 1999 मध्ये 2 मे रोजी मीरा मॉस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.
  • एस.राजेन्द्रबाबू यांनी 2004 मध्ये 2 रोजी भारताचे 34वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.