दशांश अपूर्णांक

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

दशांश अपूर्णांक

A) ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10 च्या घातांकात असतो. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात.

उदाहरणार्थ :-  8/10 = 0.8,  3/100 = 0.03  15/100 = 0.015

 

B) व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना :

1) प्रथम छेद 10 किंवा 10 च्या घातांकात करा.

उदाहरणार्थ :- 2/5 = 2×2/5×2 = 4/10 = 0.4, 3/25 = 3×4/25×4 = 12/100 = 0.12

 

2) छेदाच्या 1 वर जेवढे शून्य असतील, तेवढया स्थळानंतर अंशांच्या संख्येत डावीकडे दशांश चिन्ह धा.

उदाहरणार्थ :- 5/100 = 0.05, 25/100 = 0.25  125/1000 = 0.125 प्रमाणे

 

C) दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना :

गुणांकातील एकूण स्थळे मोजून तेवढया स्थळानंतर गुणाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.

उदाहारणार्थ :-  15×7 = 105 :: 0.15×0.7 = 0.105 याचप्रमाणे 0.15×0.07 = 0.0105.

 

D) दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना :

1) भाजकाची जेवढी स्थळे भाज्यापेक्षा जास्त, भागाकारात तेवढे शून्य उजवीकडे देणे.

उदाहरणार्थ :- 36 ÷ 4 = 9, :: 3.6 ÷ 0.04 = 90, 0.36 ÷ 0.0004 = 900

 

2) भाज्याची जेवढी दशांश स्थळे भाजकाच्या दशांश स्थळांपेक्षा जास्त तेवढया स्थळानंतर भागाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.

उदाहरणार्थ : 75 ÷ 5 = 15  :: 0.75 ÷ 0.5 = 1.5.  0.0075 ÷ 0.05 = 0.15

गुणाकार :-

दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना गुणकांची एकूण दशांश स्थळे मोजा व गुणाकारात तेवढ्या स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह द्या.

उदा.

  1. 9×8=72
  2. 0.9×0.8=0.72
  3. 0.9×8=7.2
  4. 0.09×0.8= 0.072
  5. 0.09×0.08=0.0072

नमूना पहिला :-

उदा.
5×0.5×0.05 = ?

  1. 2.25
  2. 12.5
  3. 0.125
  4. 0.0125

उत्तर : 0.125

क्लृप्ती :-

गुणक संख्यांतील एकूण दशांश स्थळे मोजून येणार्याश गुणाकारात डावीकडे तेवढ्या दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह देणे.

(5×5×5=125  ::5×0.5×0.05=0.125)

नमूना दूसरा :-

उदा.
36÷4=9; तर 3.6÷0.04=?

  1. 0.9
  2. 9
  3. 90
  4. 0.09

उत्तर : 90

क्लृप्ती :-

भाजकाची जेवढी दशांश स्थळे भज्यापेक्षा जास्त; तेवढे भागकारात उजवीकडे शून्य येतात.

3.6 ÷ 0.04 = 90

नमूना तिसरा :-

उदा.
72÷9=8; तर 0.072÷0.9=?

  1. 800
  2. 0.8
  3. 0.08
  4. 80

उत्तर : 0.08

क्लृप्ती :-

भाज्याची भाजकापेक्षा जेवढी दशांश स्थळे जास्त तेवढ्या जास्त स्थळानंतर डावीकडे भागाकारात दशांश चिन्ह येईल.

0.072÷0.9 भाज्याची 3 स्थळे व भाजकाचे 1 स्थळ आहे, त्यामुळे भाज्याची 2 स्थळे जास्त येतात.

::उत्तरात 2 स्थळानंतर टिंब डावीकडे देणे.

0.072÷0.9=0.08

हे पण वाचा :- व्यवहारी अपूर्णांक


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.