26 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

 

चालू घडामोडी (२६ मे २०२२)

श्रीलंकेच्या अर्थखात्याची धुरा रानिल विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर :

 • श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी बुधवारी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.
 • 73 वर्षांचे विक्रमसिंघे यांना वित्त, आर्थिक स्थैर्य व राष्ट्रीय धोरण मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
 • देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व आर्थिक संकटातून ओढवलेल्या राजकीय सर्कशीनंतर, पाच वेळा पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना 12 मे रोजी पुन्हा या पदावर स्थापित करण्यात आले होते.
 • आर्थिक संकट हाताळण्यासाठी सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्याबाबत आपले बंधू गोताबया यांच्या योजनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामी दिलेले महिंदू राजपक्षे यांची त्यांनी जागा घेतली.

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदची अंतिम फेरीत धडक :

 • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
 • तर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
 • प्रज्ञानंदने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत उपांत्य फेरीत हॉलंडच्या अनिश गिरीला 3.5-2.5 असा पराभवाचा धक्का दिला.
 • तसेच या फेरीत त्याच्यापुढे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या िडग लिरेनचे आव्हान असेल.
 • लिरेनने उपांत्य फेरीत धक्कादायक निकालाची नोंद करताना पाच वेळा जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर 2.5-1.5 अशी मात केली.

माजी पाकिस्तानी खेळाडू उमर गुलची अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती :

 • अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका दिग्गज माजी खेळाडूची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती आहे.
 • अफगाणिस्तानने अलीकडेच इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
 • त्यांच्या साथीला आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यापासून गुल नवीन आपल्या कामाची सुरुवात करणार आहे.
 • तर या दौऱ्यात अफगाणिस्तान तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे.
 • उमर गुल हा पाकिस्तान क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज होता.

कॅलिफोर्नियातील ऑकलंड कोलेजियममध्ये रंगणार टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार :

 • 20-20 षटकांच्या या क्रिकेट फॉरमॅटच्या प्रसिद्धीसाठी आणि चाहत्यांच्या मनोरंजानासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी ट्वेंटी विश्वचषक खेळवण्यास सुरुवात केली.
 • दर दोन वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन केले जाते.
 • पुढील टी ट्वेंटी विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.
 • तर या स्पर्धेचे यजमानपद युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्याकडे देण्यात आले आहे.
 • त्यामुळे हे दोन्ही देश संयुक्तपणे टी ट्वेंटी विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन करतील.
 • यानिमित्त अमेरिकेला पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करता येणार आहे.

दिनविशेष :

 • युरोपियन समुदायाने (EU) 1986 मध्ये 26 रोजी नवीन ध्वज अंगीकारला.
 • 1989 मध्ये 26 मध्ये मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.
 • 2014 मध्ये 26 रोजी मिस्टर. नरेंद्र मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
 • आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक ‘बेंजामिन पियरे पाल’ यांचा जन्म 1906 मध्ये 26 रोजी झाला.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.