21 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (२१ मे २०२२)

करोना लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक-2’ मोहीम :

 • करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम संथ झाली आहे.
 • त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांना जूनपासून ‘हर घर दस्तक – मोहीम 2’ दोन महिने राबवण्याची सूचना केली आहे.
 • आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे, की देशभरात संपूर्ण लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मोहिमेची गती वाढवण्याची गरज आहे.
 • तर पत्रकात नमूद केले आहे, की ‘हर घर दस्तक’ योजनेचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुसरा टप्पा राबवावा.
 • तसेच येत्या जून व जुलैत सर्व जिल्हे, गाव पातळीवर सर्वत्र ही योजना अंमलात आणावी.
 • तर या योजनेंतर्गत पहिली, दुसरी किंवा प्रतिबंधक तिसरी लसीकरण मात्रा देण्यासाठी घरोघरी जाऊन पोहोचायचे आहे.

प्रवाशांसह चालकांनाही खूश करण्याचा उबरचा निर्णय :

 • ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उबर या अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेने अनेक उपाय-योजनांची घोषणा गुरुवारी केली.
 • तर त्यात उबर चालकांना सेवा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रवाशाच्या गंतव्यस्थानाची माहिती आधी पाहता येईल.
 • त्यामुळे त्यांना सेवानिवडीचे स्वातंत्र्य मिळेल. स्वीकारलेली सेवा रद्द करणे, चालकाने वातानुकूलन यंत्रणा चालू न करणे किंवा ऑनलाइन शुल्क स्वीकारण्यास नकार देणे यांसारख्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, कंपनीने नवे उपाय योजल्याचे ‘उबर’ने निवेदनात म्हटले आहे.
 • सेवा स्वीकारून ग्राहकांना ती ऐनवेळी रद्द करण्यास सांगणे किंवा वातानुकूलित यंत्रणा सुरू नसल्याबद्दल ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन ‘उबर’ने अनेक उपाययोजना जाहीर केल्या.
 • प्रवाशांच्या गंतव्यस्थानाची माहिती उबर चालकांना देण्याचे सेवावैशिष्टय़ कंपनीने 20 शहरांमध्ये कार्यान्वित केले आहे.
 • त्याचा विस्तार आता अन्य शहरांमध्ये करण्यात येणार असल्याचे ‘उबर’ने निवेदनात म्हटले आहे.

चेन्नईला पराभूत करुन राजस्थानचा थेट क्वॉलिफायर 1 मध्ये प्रवेश :

 • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 68 वा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
 • तर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला धूळ चारली.
 • चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र राजस्थानने ही धावसंख्या पाच गडी राखत गाठले.
 • तर या विजयासह राजस्थानने क्वॉलिफायर 1 मधील आपले स्थान पक्के केले असून या संघाने गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

दिनविशेष:

 • 1881 चा 21 मध्ये वॉशिंग्टन (डी.सी.) येथे अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली.
 • पॅरिसमध्ये फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) ची स्थापना 1904 चा 21 रोजी झाली.
 • पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे 1991 मध्ये 21 रोजी आत्मघातकी पथकाने हत्या केली.
 • 1994 मध्ये 21 मध्ये 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment