27 जुलै 2022 चालू घडामोडी | 27 July 2022 Current Affairs In Marathi

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (27 जुलै 2022)

गौतम अदानीं विकासासाठी 60,000 कोटी देणार :

 • अदानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानींनी मंगळवारी ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी 60 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
 • ते वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणात बोलत होते. यावेळी त्यांनी 2022 हे वर्ष वैयक्तिक दृष्टीने महत्त्व सांगायचे असल्याचंही सांगितलं.
 • वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, लोकांचे वाढते विस्थापन, आरोग्य सेवांचा फोलपणा, शिक्षण क्षेत्रात आलेले साचलेपण, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या प्रश्नांचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.
 • गौतम अदानी म्हणाले, मला 2022 या वर्षाचे माझ्या वैयक्तिक दृष्टीने असलेले महत्त्व सांगायचे आहे. या वर्षी माझे वडील आणि आदर्श शांतीलाल अदानी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि माझ्याही साठव्या वर्धापन दिनाचे वर्ष आहे.
 • यानिमित्ताने अदानी कुटुंबाने एकत्रितपणे मुख्यतः ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी 60,000 कोटी रुपयांची रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण :

 • देशात फाईव्ह जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.
 • तर या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी अशा चार कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
 • आता लिलावाच्या दुसऱ्या फेरीतच स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे ही लिलाव प्रक्रिया पूर्ण व्हायला किती वेळ लागणार हे अस्पष्ट आहे.
 • अतिवेगवान 5 जी ध्वनिलहरींच्या या लिलावात सहभागी होण्यासाठी दूरसंचार क्षेत्रातील या आघाडीच्या कंपन्यांना सरकारकडे अग्रिम ठेव रक्कम (Deposit amount) जमा करावी लागते.

बीसीसीआयने केला शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार :

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार केला आहे.
 • त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून भारतीय संघाचा शीर्षक प्रायोजक paytmvg मास्टरकार्ड असेल.
 • विशेष म्हणजे, पेटीएमने स्वत: आपले सर्व अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती बीसीसीआय केली होती होती. पेटीएमची ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.
 • 2019 मध्ये, बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी पेटीएमचे शीर्षक प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते.
 • फक्त, आर्थिक अचडणीपोटी पेटीएमने शीर्षक प्रायोजकत्व सोडण्याचा निर्णय घेतला.
 • यासोबतच आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंतीही बीसीसीआयकडे केली होती.

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर :

 • भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे.
 • त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
 • दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) एक निवेदन जारी करत दिली आहे.
 • रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्य पदक जिंकलं होतं.
 • तर या स्पर्धेतील कामगिरीदरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारताने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम :

 • सध्या भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
 • तर या मालिकेत भारताकडे 2-0 अशी विजयी आघाडी आली आहे.
 • रविवारी झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा दोन गडी राखून पराभव करून पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला आहे.
 • भारतीय संघाने एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.
 • वेस्ट इंडीजविरुद्धची सलग 12वी द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकून भारताने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
 • तर 2007 ते 2022 या काळात भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली गेलेली प्रत्येक एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
 • यापूर्वी पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिका जिंकून विश्वविक्रम केला होता.

दिनविशेष :

 • 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपडी निवड झाली. हा एक विक्रमच आहे.
 • द्रवखनिज तेलवायूचा म्हणजेच एलपीजी वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने 1999 मध्ये मंजूर केला होता.
 • 27 जुलै 2012 रोजी लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment