वय (वयवारी)


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Contents show

वय (वयवारी)

प्रकार पहिला :-

पहिला नमुना –

उदा. अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?

 • 15 वर्षे
 • 10 वर्षे
 • 5 वर्षे
 • 20 वर्षे

उत्तर : 5 वर्षे

स्पष्टीकरण :-
वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.
अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

नमुना दुसरा –

उदा. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?

 • 11 वर्षे
 • 36 वर्षे
 • 34 वर्षे
 • 38 वर्षे

उत्तर : 38 वर्षे

स्पष्टीकरण :-
दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2
(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

नमूना तिसरा –

उदा. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?

 • 24 वर्षे
 • 32 वर्षे
 • 40 वर्षे
 • 48 वर्षे

उत्तर : 32 वर्षे

स्पष्टीकरण :-
राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x

दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x
फरक = 3 x – x = 2x = 16,
x=8
4x = 4 × 8 = 32

नमुना IV –

उदा. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

 • 21 वर्षे
 • 23 वर्षे
 • 15 वर्षे
 • 28 वर्षे

उत्तर : 21 वर्षे

स्पष्टीकरण :-
सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20-5 = 15 वर्षे,

अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास
x/3+8=15 म्हणून x/3=7
x=21

दुसरा प्रकार :-

पहिला नमुना –

उदा. सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती?

 • 10 वर्षे
 • 12 वर्षे
 • 15 वर्षे
 • 18 वर्षे

उत्तर : 12 वर्षे

स्पष्टीकरण :-
सीता : गीता
आजचे वय   6x  :  5x
दोन वर्षापूर्वीचे (6x-2)2 :  (5x-2)
6x-2 / 5x-2 = 5/4
४ (६x-२) = ५ (५x-२)
24x-8=25x-10
x=2
सीताचे आजचे वय = 6x = 6×2=12 वर्षे
नमुना दुसरा –

उदा. मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होईल, तर मुलीचे आजचे वय किती?

 • 6 वर्षे
 • 10 वर्षे
 • 35 वर्षे
 • 11 वर्षे

उत्तर : 11 वर्षे

स्पष्टीकरण :-
मुळी : आई

5 वर्षांपूर्वी 1 : 5
आजचे वयांचे
भौमितिक (x+5): (5x+5)
5 वर्षांनंतर
वयांचे गुणोत्तर (x+10) : (5x+10)
x+10/5x+10 = 2/5
5 (x+10) = 2 (5x+10)
5x=50=10x+20
5x = 30
x=6
मुलीचे आजचे वय = x+5
6+5 = 11 वर्षे

नमूना तिसरा –

उदा. मुलगा, आई, वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्षे, 30 वर्षे व 40 वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वये 3:7:9 या प्रमाणात होतील ?

उत्तर: 5

स्पष्टीकरण:
3+7+9=19 भाग,  उदाहरणाप्रमाणे (10+30+49) = 80

80 + 3x / 19 = 19 × 5 = 95
८५ – ८० = १५,
3x = 15
x=5

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment