03 जानेवारी 2022 [ चालू घडामोडी / Current Affairs In Marathi ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

03 जानेवारी 2022 | Current Affairs In Marathi

1. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) साठी सध्याची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा किती लाखांवर ठेवण्याची शिफारस स्वीकारली आहे ? 

उत्तर : आठ लाख रुपये किंवा त्याहून कमी.  

2. राजकीय गतिरोधामुळे कोणत्या देशाचे पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ? 

उत्तर : सुदान.  

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश विद्यापीठ येथे पहिल्या क्रीडा विद्यापीठचे भूमिपूजन केले , त्या विद्यापीठाचे नाव काय आहे ? 

उत्तर : मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ ( मेरठ ). 

4. देशातील कोणते राज्य देशातील पहिले एलपीजी-मुक्त आणि धूर-मुक्त राज्य बनले आहे ? 

उत्तर : हिमाचल प्रदेश.  

5. ” रिपोर्ट विदाऊट बॉर्डर्स ” ( RSF ) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वार्षिक अहवालानुसार, 2021 मध्ये जगभरात किती पत्रकारांचा छळ झाला आहे ? 

उत्तर : ४८८ पत्रकार ( चीन- १२७) 

6. हिमाचल प्रदेश क्रिकेट बोर्डाने ( HPCA ) विजय हजारे ट्रॉफी विजेत्या संघाला किती रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे ? 

उत्तर : एक कोटी रुपये.  

7. केंद्रीय शिक्षण विभागाने जारी केलेल्या अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन अचिव्हमेंटमध्ये कोणत्या संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला आहे ? 

उत्तर : KIIT.  

8. भारतीय वंशाचे ब्रिटिश शिक्षणतज्ञ आणि हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड अजय कुमार कक्कर यांना कोणत्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे ? 

उत्तर : नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश अंपायर.  

9. देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे ? 

उत्तर : केरळ उच्च न्यायालय.  

10 केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 100 दिवस पुस्तक वाचन मोहीम सुरू केली आहे , या मोहीमेचे काय नाव आहे ? 

उत्तर : पढ़े भारत.  

11. कोणत्या कंपनीने बॉलीवूड अभिनेते विजय राज आणि वरुण शर्मा यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे ? 

उत्तर : ईजी ट्रिप प्लानर्स लिमिटेड.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ३३,७५० (१२३ मृत्यू ). 

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment