23 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (२३ मे २०२२)

श्रीलंकेत आणीबाणी मागे :

 • श्रीलंकेत दोन आठवडय़ांपासून लागू केलेली आणीबाणी शुक्रवारी मध्यरात्री हटवण्यात आली.
 • देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आला.
 • देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जीवनावश्यक वस्तू्ंच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड जनक्षोभ उसळल्याने
 • सरकारविरोधी निदर्शने होत असल्याने आणीबाणी देशभर लागू करण्यात आली होती.
 • तर अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. वा

भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूलमध्ये प्रवेश :

 • भाजपचे खासदार अर्जुन सिंह हे तृणमूल काँग्रेसमध्ये परतले असून हे भाजपसाठी नुकसानकारक असल्याचे भाजप नेत्यांनी मान्य केले आहे.
 • पश्चिम बंगालमधील ताग उद्योगाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सिंह यांनी केंद्राला लक्ष्य केले होते.
 • केंद्राच्या ताग उद्योगाबाबतच्या धोरणांवर टीका करतानाच अर्जुन सिंह यांनी आपण भाजपमध्ये मुक्तपणे काम करू शकत नसल्याची तक्रारही केली होती.
 • त्यांनी रविवारी कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कॅमॅक पथावरील कार्यालयात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 • तसेच यात बराकपूर आणि उत्तर 24 परगणा भागातील नेत्यांचा समावेश घडतात.

‘फिफा’,‘एएफसी’ शिष्टमंडळाचा जूनमध्ये भारतात आढावा दौरा :

 • सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा दैनंदिन कारभार पाहिला जात आहे.
 • ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) संयुक्त शिष्टमंडळ संघटनात्मक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भारतात येणार आहे.
 • ‘फिफा’ आणि ‘एएफसी’ शिष्टमंडळाचा भारत दौरा जूनमध्ये असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फुटबॉल संघटनेची सद्य:स्थिती समजून घेणे, हा मुख्य उद्देश आहे.

सुपरबेट बुद्धिबळ स्पर्धात आनंदला विजेतेपद :

 • माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने एक फेरी बाकी असतानाच शनिवारी सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धेतील जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 • आनंदने सहा सामने जिंकले, तर दोन बरोबरीत सोडवत जलद प्रकारात वर्चस्व गाजवले.
 • सहाव्या फेरीअंती पाच विजय आणि एक बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताच्या आनंदने सातव्या फेरीत रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूला 25 चालींत नामोहरम केले.
 • जलद बुद्धिबळ स्पर्धा नऊ फेऱ्यांची असून, त्यानंतर होणाऱ्या अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक एकमेकांशी दोनदा सामना करतील.

दिनविशेष :

 • 1737 मध्ये 23 मध्ये पोर्तुगीजांकडून जिकाल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
 • सिरिल डॅमियानला अकोड्रिनया या वाघाचे पेटंट 1829 मध्ये 23 मध्ये मिळाले.
 • पश्चिम जर्मनी अरे राष्ट्र 1949 मध्ये 23 मध्ये अस्तित्वात आले.
 • आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक 1956 मध्ये 23 रोजी मंजूर झाले.
 • बचेन्द्री पाल यांनी 1984 मध्ये 23 रोजी दुपारी 1.09 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
 • जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती सन 1995 मध्ये 23 मे रोजी प्रकाशीत केली गेली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment