12 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१२ जून २०२२)

‘एमआरएनए’लशींमुळे हृदयविकाराची जोखीम :

  • करोनावरील ‘mRNA’ लसीकरणानंतर हृदयविकाराची जोखीम वाढत असल्याचा अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचा अभ्यास प्रतिष्ठित ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यामुळे लसीकरण नियमावलीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
  • तथापि, भारतात तयार केलेल्या आणि प्रामुख्याने वापरण्यात येणाऱ्या करोना लशी त्या प्रकारात मोडत नसल्या तरी भारतही ‘एमआरएनए’ लस तयार करीत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
  • कोविशिल्ड भारतात बनवले जाते लस प्रतिपिंडे तयार करणारी (रिप्लिकेटिंग व्हेक्टर व्हॅक्सिन), तर कोव्हॅक्सिन ही लस निष्क्रिय जंतूंचा वापर (इनअ‍ॅक्टिव्हेटेड पॅथोजन बेस्ड) करून तयार करण्यात आली आहे.
  • परंतु भारत सध्या ‘एमआरएनए’ लस तयार करीत असून ‘लॅन्सेट’मधील अभ्यास त्या अनुषंगाने लक्षात घ्यावाअसे म्हटले जाते.
  • ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार एमआरएनए लसीकरणानंतर, विशेषत: 18 ते 25 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जळजळ (मायोकार्डिटिस) किंवा हृदयावरणाचा दाह (पेरीकार्डिटिस) या व्याधींचा धोका वाढतो; परंतु हा धोका अगदी दुर्मीळ असतो, असेही या अभ्यासात स्पष्ट केले आहे.

नॉर्वे अ-गट बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदला अजिंक्यपद :

  • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नॉर्वे अ-गट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
  • प्रज्ञानंदने नऊ फेऱ्यांमध्ये एकूण 7.5 गुणांची कमाई केली.
  • तर गेल्या महिन्यात चेसेबल मास्टर्स स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या प्रज्ञानंदला नॉर्वे अ-गट खुल्या स्पर्धेसाठी अग्रमानांकन लाभले होते.
  • तसेच त्याने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना नऊपैकी सहा सामने जिंकले आणि तीन सामने बरोबरीत सोडवले.
  • प्रज्ञानंदने या स्पर्धेतील अखेरच्या फेरीत भारताच्याच व्ही. प्रणीतला पराभूत केले.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राची सरशी :

  • टेनिस, टेबल टेनिस आणि जलतरण क्रीडा प्रकारात मिळवलेल्या तीन सुवर्णपदकांच्या बळावर महाराष्ट्राने शनिवारी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत हरयाणाला मागे टाकले.
  • महाराष्ट्राच्या खात्यावर 37 सुवर्ण, 33 रौप्य आणि 28 कांस्य अशी एकूण 98 पदके जमा आहेत.
  • तर हरयाणाने 36 सुवर्ण, 33 रौप्य आणि 39 कांस्यपदकांसह 108 पदके कमावली आहेत.
  • जलतरणात अपेक्षा फर्नाडिसने 200 मीटर मुलींच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवताना नवा विक्रम नोंदवला.
  • चार बाय 100 मीटर रीलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नाडिस, संजिती साहा, आन्या वाला यांनी रौप्यपदक संपादन केले.
  • याचप्रमाणे 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पलक जोशीने रुपेरी पदक जिंकले.

दिनविशेष :

  • 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
  • भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म इ.स. 499 मध्ये 12 जून रोजी झाला.
  • गोपाळकृष्ण गोखले यांनी १२ जून १९०५ रोजी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली.
  • 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.