13 जून 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१३ जून २०२२)

जैतापूर प्रकल्पासंदर्भात फ्रान्सच्या प्रस्तावावर विचार :

 • युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाबरोबरच्या नागरी आण्विक भागीदारीबद्दल अनिश्चितता असताना फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनी (इडीएफ)च्या लांबलेल्या कराराबद्दल आता आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
 • जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पात सहा इपीआर अणुभट्टय़ा पुरवण्याच्या प्रस्तावास भारताने तत्त्वत: मान्यता दिली होती.
 • महाराष्ट्रातील जैतापूर येथे सहा इपीआर अणुभट्टय़ा उभारण्यास मदत करण्याबाबत फ्रान्सच्या सरकारी अणुऊर्जा कंपनीने दिलेल्या प्रस्तावाचे परीक्षण भारताचा अणुऊर्जा विभाग करीत आहे.
 • गेल्याच महिन्यात इडीएफचे एक उच्चस्तरीय पथक भारतात आले होते.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमान्यूएल मॅक्रॉन यांच्यात मेमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेची ही फलश्रुती असल्याचे सूत्रांनी सांगितले
 • फ्रान्सशी 2008 मध्ये झालेल्या व्यापक आण्विक करारानुसार जैतापूर येथे 1650 मेगावॅट इलेक्ट्रिक (एमडब्ल्यूइ) क्षमतेच्या सहा अणुभट्टय़ा उभारण्यास भारताने तत्वत: मान्यता दिली होती.

विश्वचषक पॅरानेमबाजी स्पर्धात अवनीला दुसरे सुवर्ण :

 • भारताची युवा पॅरानेमबाज अवनी लेखराने फ्रान्स येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा क्रीडा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.
 • अवनीने महिलांच्या आर8 गटातील 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन एसएच1 गटात सुवर्ण कामगिरी केली.
 • अवनीने 458.3 गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले.
 • तर व्हेरॉनिका व्हादोव्हिकोव्हा आणि स्वीडनची अ‍ॅना नॉर्मन या अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरल्या.
 • लेखराने यापूर्वी महिलांच्या आर2 गटातील 10 मीटर एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

युवा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धात भारताला दोन रौप्यपदके :

 • आकांक्षा व्यवहारे आणि विजय प्रजापती या भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना रविवारी युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात रौप्यपदकाची कमाई केली.
 • मेक्सिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षाने एकूण 127, तर विजयने 175 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले.
 • आकांक्षा आणि विजय हे अनुक्रमे औरंगाबाद आणि पतियाळा येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलंसमध्ये सराव करतात.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात महाराष्ट्र अग्रस्थानी कायम :

 • महाराष्ट्राने रविवारी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली.
 • जलतरणात अपेक्षा फर्नाडिसने दोन सुवर्णपदके जिंकत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह तिरंदाजीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. टेबल टेनिसमध्ये दिया चितळेने सुवर्णपदक जिंकले.
 • युवा खेळाडूंनी केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राने पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे.
 • महाराष्ट्राच्या खात्यावर 41 सुवर्ण, 36 रौप्य आणि 29 कांस्य अशी एकूण 106 पदके जमा आहेत.
 • दुसऱ्या स्थानावरील हरयाणाने महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पदके मिळवली असली तरी सुवर्णपदकांमध्ये ते पिछाडीवर आहेत.
 • हरयाणाने आतापर्यंत या स्पर्धेत 39 सुवर्ण, 34 रौप्य आणि 42 कांस्य अशी 115 पदके कमावली आहेत.

दिनविशेष :

 • प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतोअसा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म 13 जून 1831 मध्ये झाला होता.
 • कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म १३ जून १८७९ मध्ये झाला.
 • 1983 मध्ये पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.