चालू घडामोडी (१७ मे २०२२)
मोदींच्या नेपाळ दौऱ्यात सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या :
- भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्याशी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली.
- दोन्ही देशांतील सहकार्य अधिक दृढ व्हावे व नवनवीन क्षेत्रांत बहुआयामी भागीदारी वाढावीया मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
- तर या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधित सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
- नेपाळच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून मोदी नेपाळच्या एकदिवसीय दौऱ्यावर गेले होते.
- तसेच 2014 पासूनचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे.
त्रिपुरात 11 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी :
- सत्ताधारी भाजपचे नऊ आणि मित्रपक्ष आयपीएफटीचे दोन अशा 11 आमदारांना सोमवारी त्रिपुरातील माणिक साहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
- मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भाजप- आयपीएफटी आघाडी सरकारच्या मंत्र्यांना राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एस.एन. आर्या यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
- कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये भाजपचे जिष्णू देव वर्मा, रतन लाल नाथ, प्रणजित सिंग रॉय, मनोज कांती देव, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुशांत चौधरी, राम पद जमातिया आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) देववर्मा आणि प्रेमकुमार रियांग यांचा समावेश आहे.
जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धात निखत, मनिषा, परवीनची पदकनिश्चिती :
- भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीन, मनिषा आणि परवीन यांनी ‘आयबीए’ महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सोमवारी उपांत्य फेरीचा टप्पा गाठत आपले पदक निश्चित केले.
- आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती निखतने इंग्लंडच्या चार्ली-सियान डेव्हिसनला 5-0 अशी धूळ चारली.
- तर युवा बॉक्सिंगपटू परवीन ताजिकिस्तानच्या शोइरा झुल्केनारोव्हाला याच फरकाने पराभूत केले.
- दुसरीकडे, मनिषाने मंगोलियाच्या नामून मोनखोरला 4-1 अशा फरकाने नमवत आगेकूच केली.
‘महिला टी-20 चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा :
- बीसीसीआयने महिला T20 चॅलेंज 2022 सामन्यांसाठी तयारी सुरु केली आहे.
- 15 मे रोजी या सामन्यांचे मुख्य प्रायोजकत्व ‘माय 11 सर्कल’कडे गेल्यानंतर आज बीसीसीआयने सामन्यांसाठी सघांची घोषणा केली आहे.
- तर यावेळी एकूण तीन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
- 23 ते 28 इंच या कालावधित हे सामने खेळवले जाणार आहेत.
- बीसीसीआयने सुपरनोवाज, ट्रेलब्लॅझर्श आणि व्हेलॉसिटी अशा ती संघाची घोषणा केली आहे.
- सुपरनोवाज संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे तर ट्रेलब्लॅझर्स संघाचे आठवण आणि व्हेलॉसिटी संघाची धुरा दीप्ती शर्माकडे सोपवली आहे.
- तर दुसरीकडे मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासरख्या दिग्गज खेळाडूंचा यावेळी महिली टी-20 चॅलेंज 2022 सामन्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
दिनविशेष :
- १७ इंच : जागतिक उच्च रक्तदाब दिन
- १७ इंच : जागतिक माहिती संस्था दिन
- न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 17 1792 मध्ये मध्ये झाली.
- 1872 मध्ये 17 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
- १७ मे १९४० मध्ये दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
- 1949 मध्ये 17 मध्ये भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.