चालू घडामोडी (१८ मे २०२२)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G Test Bed चे अनावरण :
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI)च्या रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G चाचणी बेड लॉन्च केले.
- 5G चाचणी बेड प्रकल्प काय आहे? आयआयटी मद्रासच्या नेतृत्वाखालील 8 संस्थांनी संयुक्तपणे तयार केला आहे.
- तसेच या कार्यक्रमाला मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- भारताचे जगातील सर्वात मोठे मोबाइल उत्पादन केंद्र म्हणून वर्णन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील मोबाइल उत्पादन युनिट्सची संख्या 2 वरून 200 हून अधिक झाली आहे.
- 5 ग्रॅम चाचणी बेडशच्या टेलिकॉम उद्योगाला आणि स्टार्टअपला खूप मदत करेल.
- तर याद्वारे, उद्योग आणि स्टार्टअप 5व्या आणि पुढच्या पिढीतील उत्पादने, प्रोटोटाइप आणि सोल्यूशन्स प्रमाणित करू शकतील.
- आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, आयआएससी बंगलोर, सोसायटी ऑफ अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWit) यांनी 5जी टेस्ट बेड विकसित करण्यासाठी एकत्र काम केले आहे आणि याचे नेतृत्त्व आयआयटी मद्रास करत आहे.
महागाईने 10 वर्षातील विक्रम मोडला :
- मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे.
- महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत.
- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर पोहोचला आहे.
- तर हा आकडा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक आहे.
- मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक (WPI) 13.11 टक्क्यांवर घडतात.
- तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घाऊक किंमत निर्देशांक 10.74 टक्के इतका होता.
वॉशिंग्टन सुंदरला त्रिफळाचित करुन रचला ‘हा’ नवा विक्रम :
- आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला.
- प्रियाम गर्ग आणि निकोलस पुरन यांच्या खेळीमुळे हैदराबाद संघ 193 धावा करु शकला.
- दरम्यान मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह या सामन्यात चांगलाच तळपळा.
- तर त्याने शेवटच्या चेंडूवर विकेट घेत मोठा विक्रम नोंदवला आहे.
- बुमराहने वॉशिंग्टन सुंदरला शेवटच्या षटकात त्रिफळाचित केलं.
- तसेच या विकेटसह तो टी-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
- तर अशा प्रकारचा विक्रम करणारा बुमराह पहिलाच खेळाडू आहे.
ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये :
- बंगळुरु फ्रेंचायझीने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा आपल्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे.
- संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने तशी घेषणा केली आहे.
- आयपीएलच्या इतिहासात खेळाडूंना टीमच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान देणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुर हा पहिलाच संघ ठरला आहे.
- तर या संघाने एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या दोघांनाही हा बहुमान दिला आहे.
दिनविशेष :
- छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा 1682 मध्ये 18 मध्ये जन्म झाला.
- भारताचे 11वे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा जन्म 1933 मध्ये 18 मध्ये झाला.
- 1972 मध्ये 18 रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
- भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी रवि 1974 मध्ये 18 मे रोजी केली.
- पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने 1998 मध्ये 18 रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले.
- श्रीलंका सरकारने 2009 मध्ये 18 रोजी ‘एलटीटीई’ला पराभूत करून सुमारे 26 वर्षच्या युद्धाला संपवले.