24 मे 2022 चालू घडामोडी

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

 

विनय कुमार सक्सेना
विनय कुमार सक्सेना

चालू घडामोडी (२४ मे २०२२)

भारतासह बारा देशांशी अमेरिकेचा नवा व्यापार करार :

 • अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशातील 12 देशांची अर्थव्यवस्था बळकट व्हावी, यासाठी नवा व्यापार करार जाहीर केला.
 • बायडेन यांच्या प्रशासनाने भारत-प्रशांत महासागरीय देशांसाठी हा नवा व्यापार करार तयार केला आहे.
 • तर या करारात सहभागी सर्व देशांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केले आहे, की या कराराची आम्हा सर्व राष्ट्रांना नक्कीच भरीव मदत होणार आहे.
 • पुरवठा साखळी, संगणकीय प्रणालींद्वारे व्यापार, प्रदूषणमुक्त ऊर्जा, कामगार सुरक्षा व भ्रष्टाचारमुक्त कार्यशैली आदी क्षेत्रांत प्रभावीपणे काम करता येईल.
 • तसेच या करारात सहभागी राष्ट्रांशी अजून तपशीलवार वाटाघाटी व्हायच्या आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
 • अमेरिकेबरोबर या नव्या व्यापारी करारात भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, न्यूझिलंड, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामचा समावेश आहे.
 • अमेरिकेसह या देशांचे जगभरातील उत्पादनापैकी 40 टक्के सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आहे.

विनय कुमार सक्सेना बनणार दिल्लीचे नवे उप राज्यपाल :

 • गेल्या आठवड्यात अनिल बैजल यांनी दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला घडतात.
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
 • विनयकुमार सक्सेना उपस्थित आहेत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत.
 • तसेच त्यांनी राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
 • तर सलग अकरा वर्षे व्हाईट सिमेंट केंद्रात वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर, 1995 मध्ये गुजरातमधील प्रस्तावित बंदर प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी त्यांची जनरल मॅनेजर पदी नियुक्ती करण्यात आली होती.
 • पुढे त्यांनी ढोलेर बंदर प्रकल्पाचे सीईओ आणि संचालक म्हणून काम केलं आहे.

दावोस आर्थिक परिषदेत 30 हजार कोटींचे करार :

 • स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील 23 कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.
 • यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
 • तर झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये 55 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे.
 • तसेच यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
 • दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण 30 हजार 379 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली.
 • तर या उपक्रमाअंतर्गत एकूण 10 पुनरावृत्ती आयोजित करण्यात आल्या असून त्यामाध्यमातून आजपर्यंत 121 सामंजस्य करार झाले आहेत.

चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के :

 • भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ग्रँडमास्टर विदित गुजराथीला हरवून चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.
 • रविवारी झालेल्या 15व्या आणि अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदने विजयानिशी विदितचे आव्हानसुद्धा संपुष्टात आणले.
 • आता उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदपुढे चीनच्या वेई यि याचे आव्हान असेल.
 • तसेच 16 वर्षीय प्रज्ञानंदने सहाव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला हरवून सर्वाचे लक्ष वेधले होते.
 • तीन महिन्यांपूर्वी प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील कार्लसनला प्रथमच हरवले होते.

आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिकेसाठी राहुलकडे नेतृत्व :

 • यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये लक्ष वेधणारा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
 • आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून मायदेशात होणाऱ्या पाच ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली.
 • नियमित कर्णधार रोहित शर्मा, तारांकित फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या महत्त्वाच्या खेळाडूंना ट्वेन्टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
 • त्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपद, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश 1844 मध्ये 24 मध्ये वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
 • न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस 1883 मध्ये 24 मध्ये खुला झाला.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3 बी हा उपग्रह 2000 मध्ये 24 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
 • 2001 मध्ये 24 रोजी 18व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment