8 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी | 8 August 2022 Daily Current Affairs In Marathi

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

आंतरराष्ट्रीय मांजर दिन

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2022)

इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण :

 • कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसा सज्ज होत उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या इस्रोच्या नव्या रॉकेटचे-प्रक्षेपकाचे-लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन (SSLV)चे पहिले उड्डाण इस्रोच्या श्रीहरीकोटा तळावरुन यशस्वी पार पडले.
 • नव्या रॉकेटने त्याचे काम चोख बजावले असले, रॉकेटच्या सर्व टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी जरी केली असली, उपग्रह जरी प्रक्षेपित झाले असले तरी इस्रोने मोहिम पुर्ण झाल्याची घोषणा केलेली नाही.
 • इस्रोचा नवा प्रक्षेपक SSLV ची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे.
 • या मोहिमेला इस्रोने SSLV-D1 असं नाव दिलं होते.
 • अवघ्या 100 टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते.
 • 500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्याची SSLVची क्षमता आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताची पदकलूट :

 • राष्ट्रकुल स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकार रविवार भारतासाठी पदके मिळवून देणारा ठरला.
 • एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकेर यांनी तिहेरी उडी प्रकारात इतिहास घडवत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक कमावले.
 • तिहेरी उडीत पॉलने तिसऱ्या प्रयत्नात सरस कामगिरी करताना 17.03 मीटरचे अंतर गाठले.
 • त्याच्यापाठोपाठ सहकारी अबुबाकेरने पाचव्या प्रयत्नात १७.०२ मी उडी मारली.
 • बरमुडाच जाह नहल परिशिफ कांस्यपदकच मानकरी ठरला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात नितू, निकहत, अमितचे सोनेरी यश :

 • भारताच्या नितू घांगस (४८ किलो), निखत झरीन (५० किलो), अमित पंघाल (५१ किलो) यांनी रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदके पटकावली.
 • 2018च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने अंतिम लढतीत इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डला पराभूत केले.
 • पदार्पणवीर नितूनेही अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी रेसटनला 5-0 असे नामोहरम हे करत असतानाच त्यांनी सुवर्ण यश संपादन केले.
 • तसेच जागतिक विजेत्या निकहतने सुवर्णपदकाच्या लढतीत नॉर्दन आर्यलडच्या कार्ली मॅक नॉलवर 5-0 असा विजय मिळवला.

टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर कोरले नाव :

 • अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी रविवारी टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
 • अचंता-श्रीजा जोडीने मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा पराभव केला.
 • शरथ कमलचे त्याच्या कारकिर्दीतील मिश्र दुहेरी प्रकारातील हे पहिला सुवर्णपदक ठरले आहे.
 • तर, राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या 24 वर्षीय श्रीजाचे देखील हे पहिलेच पदक ठरले आहे.
 • पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि साथियान ज्ञानसेकरन सोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे.
 • त्यामुळे श्रीजासोबत मिळवलेले सुवर्ण पदक हे त्याचे एकून तिसरे पदक ठरले आहे.

भारतीय मुली रौप्य पदकाच्या मानकरी :

 • रविवारी महिलांच्या टी 20 क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळवला गेला.
 • या सामन्यात भारतीय संघाचा 9 धावांनी पराभव झाला.
 • परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर, भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
 • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
 • त्यात सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान मिळवला आहे. ए

नितू अन् अमितचा बॉक्सिंमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई :

 • स्पर्धेच्या दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई झाली.
 • महिलांच्या 48 किली वजनी गटात नितू घांगसने सुवर्णपदक पटकावले.
 • तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले.
 • नितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेडचा पराभव केला.
 • अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला.

भारतीय महिला हॉकी संघाला पदक जिंकण्यात यश :

 • बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आहे.
 • भारतीय संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
 • तब्बल 16 वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले आहे.
 • भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादग्रस्त पराभवाला सामोरे जावे लागले होते.
 • भारताने 2002 मध्ये सुवर्ण आणि 2006 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

दिनविशेष :

 • 8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘ आहे.
 • सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
 • भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.
 • पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.
 • 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.