7 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी | 7 August 2022 Today Current Affairs In Marathi


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

जगदीप धनखर
जगदीप धनखर

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2022)

उपाध्यक्ष जगदीप धनखर:

 • उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखर विजयी झाले असून त्यांनी विरोधी पक्षांच्या सर्वसंमत उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा अपेक्षेप्रमाणे पराभव केला.
 • उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत 93 टक्के मतदान झाले.
 • धनखड यांना 528 मते मिळाली, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. धनखड यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 73 एवढी आहे.
 • उपराष्ट्रपतीपदासाठी संसदेच्या दोन्ही सदनांतील सदस्यांना मतदान केले जाऊ शकते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात अविनाश, प्रियंका यांची रौप्यपदकांची कमाई :

 • स्पर्धेच्या नवव्या दिवशी अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला दोन ऐतिहासिक पदकं मिळाली.
 • राष्ट्रकुल स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे आणि प्रियंका गोस्वामी यांनी भारताच्या रौप्यपदकांमध्ये भर घातली.
 • अविनाशने तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात, तर प्रियंकाने 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवला.
 • अविनाश आणि प्रियंकाच्या दोन पदकांसह भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये चार पदके जिंकली आहेत.
 • चालण्याच्या शर्यतीत भारताने 12 वर्षांनी पदक मिळवले.
 • यापूर्वी 2010 मध्ये सर्वप्रथम हरिमदर सिंगने 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले होते.

19 वर्षीय भारतीय कुस्तीपटू नवीन मलिकची अविश्वसनीय कामगिरी :

 • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंची चमकदार कामगिरी सुरू आहे.
 • शनिवारी नवीन मलिक या 19 वर्षीय भारतीय कुस्तीपटूने पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले.
 • नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले पदक निश्चित केले.
 • नवीनने ताहिरचा 9-1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
 • रवी दहिया आणि विनेश फोगटनंतर नवीन मलिकने भारतासाठी कुस्तीतील सहावे सुवर्णपदक जिंकले आहे.

कुस्तीमध्ये रवी कुमार दहिया अन् विनेश फोगटची सुवर्ण कामगिरी :

 • भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
 • पुरूषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनचा पराभव केला.
 • 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला.
 • त्यापाठोपाठ महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

दिनविशेष :

 • पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण भारतीय कृषीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषिमंत्री डॉ. मनकोम्बू सांबासिवन आणि एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
 • 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
 • मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
 • सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र 1981 मध्ये बंद पडले.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment